BCCI allowed saliva to be applied to the ball : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI) आगामी सुरू होणाऱ्या आयपीयलमध्ये चेंडूला लाळ लावण्यास परवानगी दिली आहे. गुरुवारी बीसीसीआयने आगामी हंगामातील आयपीयलच्या कर्णधाऱ्यांच्या सहमतीने या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर,लाळेच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध उठवणारी क्रिकेट विश्वातील ही पहिलीच आयपीयल असणार आहे.
२२ मार्च ( शनिवार ) पासून सुरू होणाऱ्या आगामी आयपीयएलच्या आधी मुंबईत कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाळेवरील बंदी हटवण्यात आली आहे. मुंबई मध्ये झालेल्या कर्णधाऱ्यांच्या बैठकीत अनेक कर्णधार निर्णयाच्या बाजूने होते, तर काही कर्णधारांनी याला विरोध दर्शविला. चेंडूला स्विंग आणण्यासाठी आधीपासूनच चेंडूला लाळ लावण्यात येत होती. परंतु, कोरोना काळात आरोग्यविषयक खबरदारी म्हणून चेंडूवर लाळ लावण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.
IPL मधील सर्व संघाच्या कर्णधारांची बैठक मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात गुरुवारी पार पडली. ही बैठक दुपारी १२.३० वाजता नियोजित होती. मात्र, काही संघाच्या अधिकाऱ्यानी बैठकीला येण्यास विलंब झाल्याने ही बैठक उशिराने सुरू झाली. यावेळी हंगामच्या दृष्टीने विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर