बीसीसीआय कडून भारतीय संघाचा २०२३ ते २०२७ पर्यंतचा कार्यक्रम जाहीर

13

पुणे, १७ ऑक्टोबर २०२२ : टी ट्वेंटी वर्ल्डकपला कालपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान टीमशी होणार आहे, आयसीसी स्पर्धेमध्येच हे दोन संघ खेळताना दिसतात हा योग केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धेमध्येच जुळून येतो, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये मालिका केव्हा होणार याचं उत्तर बीसीसीने दिलं आहे. भारतीय संघाचा २०२३ ते २०२७ पर्यंतचा कार्यक्रम बीसीसीआय ने जाहीर केला आहे. भारतीय संघ येत्या पाच वर्षात पाकिस्तान विरुद्ध कोणतीही मालिका खेळणार नाही. फक्त आयसीसी स्पर्धेत दोघे एकमेकांविरुद्ध खेळतील, पुढील वर्षी फक्त पाकिस्तान विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

त्याचं पद्धतीने पुढील वर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला आशिया चषक २०२३ चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून, बीसीसीआया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारचा असेल.

दरम्यान भारत २०२३- २०२७ या कालावधीत एकूण ६१ टी ट्वेंटी सामने खेळणार आहे. ३१ टी ट्वेंटी घरच्या मैदानावर आणि ३० बाहेर खेळले जातील. तर येत्या पाच वर्षात भारत ४२ एकदिवसीय सामने खेळणार आहे. यातील २१ सामने घरच्या मैदानावर तर २१ सामने बाहेरच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव