मुंबई : परस्पर हितसंबंध जोपासल्याप्रकरणी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व क्रिकेटपटू कपिल देव यांना क्लीनचिट नाकारण्यात आली आहे.
बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी कपिल देव यांच्यासह माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड, शांता रंगराजन यांना घेऊन सल्लागार समिती स्थापन केली होती.
या समितीने रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षपदी निवड केली होती. यानंतर सल्लागार समितीमधील सदस्याचे परस्पर हितसंबंध असल्याची तक्रार करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर बीसीसीआयने या तिघांचीही चौकशी केली होती. या चौकशीनंतर बीसीसीआयने आज यावर सुनावणी केली.
गायकवाड आणि रंगराजन यांना बीसीसीआयने दिलासा दिला आहे. पण कपिल यांच्याबाबतचा निकाल अजूनही राखून ठेवला आहे. बीसीसीआयचे स्पष्टीकरण दिले आहे की, देव यांच्याविरोधात अजून काही तक्रारी आहेत. त्या तक्रारी ऐकल्यानंतर आम्ही कपिल यांच्याबाबत निर्णय देणार आहोत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कपिल यांना क्लिनचिट कधी मिळणार किंवा मिळणार कि नाही याविषयी क्रीडावर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे.