बीसीसीआय धोनीला देवू शकते फेअरवेल सामना

मुंबई २० ऑगस्ट ,२०२० महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्ट २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या आधी २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. आता धोनी फक्त आपल्याला आयपीएल सामन्यांमध्ये झळकताना दिसेल. तसेच धोनीच्या चाहत्यांनी त्याला निळ्या जर्सी मध्ये खेळतानाची ईच्छा व्यक्त केली होती. तसेच बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल सत्रामध्ये बीसीसीआय महेंद्र सिंग धोनी सोबत चर्चा करणार आहे त्यानुसार पुढील कार्यक्रम निश्चित होईल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,सध्या तरी कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका नाही आहे . आयपीएल नंतर हा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर ते म्हणाले महेंद्रसिंग धोनी याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलं आहे. आणि ते या सम्मानासाठी पात्र आहेत. तसेच ते म्हणाले धोनी हा वेगळा खेळाडू आहे. त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा कोणाला ही वाटलं नव्हत की तो इतक्या लवकर निवृत्ती घेईल.

त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की धोनी यांचे या बाबतीत काय म्हणणे आहे?, यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले,” नाही, परंतू या बाबतीत आयपीएल सुरू असताना आम्ही नक्की चर्चा करू तसेच त्यांचा सन्मान ही केला जाईल.ते या बाबतीत सहमत असो किवा नसो परंतू त्यांना सन्मानित करणे ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट असेल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा