मुलगी झाल्याच्या रागातून पत्नीला व आरोग्य सेवकाला मारहाण

बारामती, दि. २९ जून २०२०: सदर घटना दि.२८ रोजी दुपारी एक वाजता डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. कृष्णा काळे यांच्या पत्नीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून पत्नीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच येथे काम करत असणाऱ्या आरोग्य सेवकाला व डॉक्टरांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी आरोग्य सेवकाने काळे यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादीला दगडाने मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

मुलगी झाल्याच्या रागातून एका माथेफिरू पित्याने आरोग्य केंद्रात गोंधळ घालत पत्नीसह आरोग्य सेवकाला जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आरोग्य सेवाकवर बारामतीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील कृष्णा बाळासाहेब काळे (रा. डोर्लेवाडी) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याने तसेच अमानुष पणे मारहाणप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळू नाना चव्हाण या आरोग्य सेवकाने फिर्याद दिली असून आरोपीला पोलिसानी अटक केली आहे.

सदर घटना दि.२८ रोजी दुपारी एक वाजता डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. कृष्णा काळे यांच्या पत्नीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून पत्नीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच येथे काम करत असणाऱ्या आरोग्य सेवकाला व डॉक्टरांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी आरोग्य सेवकाने काळे यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादीला दगडाने मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा