गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय कोरोनामुळे दहा दिवसांच्या मुलीला सोडले सौचालयात

कोरोनामुळे दहा दिवसांच्या मुलीला सोडले सौचालयात

चीन: कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काल पुण्यात कोरोनाची दोन जणांना पुष्टी झाल्यावर पुण्यातील नायडू भागातील रस्त्यांवर शुकशुकाट झाला होता. परंतु आता कोरोनाच्या भीतीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. चीन मध्ये आईने आपल्या दहा दिवसांच्या मुलीला सौच्छालयाच्या गार पडलेल्या फरचिवर सोडून दिले. हे एका व्यक्तीने बघितले आणि पोलिसांना आणि प्रशासनाला याची माहिती दिली.

झाओ नावाचा एक माणूस चीनच्या सिचुआन प्रांतातील मियांयांग शहरात सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी गेला होता. मग त्याने पाहिले की एका मुलीची ओरड एका क्यूबिकलच्या आतून येत आहे. त्याने लगेच त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. झाओच्या लक्षात आले की एका शौचालयाच्या क्यूबिकलमध्ये एक दहा दिवसांची मुलगी फरशीवर थंडीने कुडकुडत आहे.

ते लहान बाळ जोरजोरात रडत होते. त्या व्यक्तीने लगेच गरम कपडे तिच्या अंगावर टाकले व पोलिसांना खबर दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version