गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा बीड झाले जलमय, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

बीड झाले जलमय, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

बीड, २१ ऑक्टोबर २०२२: परतीच्या पावसाने सर्वत्र कहर केला आहे. यात बीड जिल्ह्यात देखील मुसळदार पाऊस झाला आहे. यामुळे बीडचे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले असून पुन्हा एकदा सहा दरवाजे उघडले असता यातून ८७३६.६८ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीत पाण्याचा विसर्ग सूरु केला आहे.

धरणाचे १, ३, ४, ६ हे दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. तर २, ५ हे दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. परंतू पाण्याची आवक पाहून धरणातील विसर्ग कमी अथवा वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना व कालव्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

बीड शहरात तब्बल दोन तास झालेल्या मुसळदार पावसामुळे शहरातील मुख्य महामार्गाला तळ्याचे स्वरुप आले असून बीड शहर जलमय झाले आहे. वाहनधारकांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. तसेच बीड, अंबाजोगाई, केज, माजलगाव, आष्टी, गेवराई यासह सर्व तालुक्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version