गोल पोस्ट गुन्हा बीड जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला

बीड जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला

बीड, दि.१४ मे २०२०: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफ वडगाव शिवारात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला आहे.

या हल्ल्यात तिघांचा खून करण्यात आला असून एक जण गंभीर जखमी आहे. बाबू पवार, प्रकाश पवार आणि संजय पवार असं मृत झालेल्या व्यक्तींचे नावेआहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोन गटात शेतीच्या कारणावरून वाद सुरू होता. आणि या वादाचे रूपांतर भांडणात होऊन टोकाला गेले. आज पहाटे तीनच्या सुमारास बारा जणांच्या टोळक्याने एकाच कुटुंबात राहणाऱ्या तिघांवर हल्ला चढवला. यात तिघांचाही जागेवर मृत्यू झाला.पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version