बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

बीड: बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय प्रकार घडताना दिसत आहे. भाजपचे तीन नेते राष्ट्रवादीच्या गोटात गेल्याची माहिती समोर आली आहे. या नाट्यमय प्रकारामुळे बीडच्या जिल्हा परिषदेवर नक्की कोणाचे वर्चस्व असणार आहे हा उत्सुकतेचा विषय झाली आहे.

बीडच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा एक वेगळा इतिहास आपण बघितला आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या आहेत तेव्हा तेव्हा बंडखोरी झाली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हा या निवडणुकीचा इतिहास आहे. या वेळेस ही हे घडताना दिसत आहे. राष्ट्रवादीची बैठक काल रात्री झाली. ही बैठक धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाली. ही बैठक रात्री २ पर्यंत चालली होती.

ज्यांच्याकडे २७ सदस्य असतील त्यांचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेच्या ठिकाणी होणार आहे. महाविकास आघाडी त्यांच्याकडे ३० पेक्षा जास्त सदस्य असल्याचा दावा करत आहे.

येथे एक गोष्ट आहे ती अशी की, बीड मधी ही निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी कधीच नसते. तर ती मुंडे विरुद्ध मुंडे अशी असते. हे दृश्य या निवडणुकीत ही बघण्यास मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांना घेऊन धनंजय मुंडे आहेत तर दुसरीकडे भाजपा आणि सहयोगी सदस्यांना एकत्र घेऊन प्रीतम मुंडे मैदानात उतरले आहे. त्यामुळे मोठी चुरस या निवडणुकीत निर्माण झाली आहे.

अडीच वर्षांपूर्वी या निवडणुकीत राष्ट्रवादीला बहुमत असताना सुद्धा सूरज दास यांनी बडखोरी करून ही निवडणूक भाजप च्या ताब्यात दिली होती. आता ती पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार आहे का हे पाहावं लागणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा