गोल पोस्ट गुन्हा बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील तिघांचा खून

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातील तिघांचा खून

बीड, दि.२४ मे २०२० : बीड शहरातील शुक्रवार पेठेमधील तकवा भागात एकाच कुटूंबातील तिघांचा खुन झाल्याची घटना आज (रविवारी) दुपारी समोर आली. पतीनेच चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलांचा खून केल्याची चर्चा असून आरोपी पती स्वत:हून पेठ बीड  ठाण्यात हजर झाला.

संगीता संतोष कोकणे (३१), संदेश संतोष कोकणे (१०), मयुर संतोष कोकणे (७, सर्व रा.तकवा, शुक्रवारपेठ, बीड) अशी मयतांची नावे आहेत. तर संतोष कोकणे आरोपीचे नाव आहे. संगीता कोकणे व त्यांचा मुलगा संदेश  कोकणे या दोघांचे मृतदेह घरात तर सात वर्षीय मयूरचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला. माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड ठाण्याच्या घटनास्थळी धाव घेतली.

चारित्र्याच्या संशयावरून तिहेरी खून प्रकरण घडले असल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये पोलीसांनी सांगितले आहे. दरम्यान संतोष कोकणेला पोलीसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version