बीड शहरातील कर्फ्यू विरोधात न्यायालयात जाणार : सय्यद सलिम

बीड,दि.२९मे २०२० : बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी मध्यरात्री शहरात ८ दिवस कर्फ्यू लावण्याचे काढलेले आदेश शासनाच्या धोरणाच्या विरोधात आणि सामान्य लोकांच्या अडचणी वाढविणारे आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश मागे घ्यावेत, अन्यथा आपण या विरोधात न्यायालयात जाऊ, असे पत्रक बीडचे माजी आमदार सय्यद सलीम यांनी काढले आहे.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी( दि.२७)च्या मध्यरात्री अचानक बीड शहरासह काही गावे पुढील ८ दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याकाळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील सुरु राहणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक काढलेल्या या आदेशांमुळे सामान्यांचे अधिकच हाल होणार आहेत.

एकीकडे नॉन रेड झोनमध्ये हालचाली सुरु करा तसेच रेड झोनमध्ये देखील संपूर्ण लॉकडाऊन नको, असे आदेश असतानाही बीडमध्ये मध्यरात्री कर्फ्यूचे आदेश काढले जातात , हे सामान्यांना अडचणीत आणणारे असल्याचे सांगत माजी आमदार सय्यद सलीम यांनी या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा