Real Cost of Beer vs Selling Price: आपल्याला मार्केटमध्ये जी बियर 180 रुपयांना मिळते. तिची खरी (Production cost) किती आहे. तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला याची खरी Cost समजली तर तुम्ही सुद्धा 10 वेळा विचार करतील. बाजारात मिळणारी 180 रुपयांची बियर कारखान्यात अवघ्या 25 ते 30 रुपयांत बनते. मग आपल्याकडून वरचे 150 रुपये का घेतले जातात आणि ते कुठे जातात ? चला तर मग जाणून घेऊ.
मग वरच्या 150 रु घोळ काय ?

श्रावण मासांत मांसहार आणि मध्य विक्रीवर बंदी असते. त्यामुळे श्रावणाआधी येणारी आषाढ आमवस्या ज्याला गटारी म्हणतात हिची अनेक दारूप्रेमी वाट बघत असतात. कारण याचदिवशी सगळ्यात जास्त प्रमाणात मध्यविक्री होती. आता 150 रूपयाच्या मुळ मुद्याकडे येऊयात. ज्यावेळी बियर कारखाण्यातून मार्केटमध्ये येते,तेव्हा बियरचा वाहतूक आणि पॅकिंगचा(Transport and Packaging) खर्च 10 रुपये येतो. त्यात (Company Profit) 15 रुपये, बियरच्या एका बाटलीचा खर्च 25 रुपये, मग त्याच बाटलीवर 30 रुपये Vat लावला जातो आणि त्याच बियरच्या बाटलीच्या मागे 70 रुपये Production Cost आकरली जाते. या सर्व खर्चानंतर बियरच्या बाटलीचे बाजार मूल्य 180 रुपये बनते.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर













































