चेन्नई, ४ ऑगस्ट २०२० : IPL अर्थात इंडियन प्रिमियर लीगचा हंगाम लवकरच सुरु होणार असून ,भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये एक आंनदाची लाट उसळसली आहे. IPL चा हा हंगाम कोरोनामुळे भारतात नसून युएईत होत आहे.त्यात आता एक नवीन माहिती सीएसकेच्या गोटातून समोर आली आहे.
सीएसकेने खेळाडूंच्या कोरोना चाचणी बद्दल महत्वाची बातमी दिली असून,धोनी सह सर्व खेळाडूंची चाचणी आत्यावश्यक आहे असे सांगितले जात आहे. कोरोना चाचणी झाल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला युएईत जाता येणार नाही. अशी माहिती सीएसकेच्या आधिका-याने दिली आहे. तसेच सीएसके संघाला २० ऑगस्टला युएईत पोहचायचे आहे, आणि त्यासाठी खेळाडुंची चाचणी हि १८-१९ ऑगस्टला होईल असे सांगण्यात येत आहे.
धोनी IPL साठी सज्ज……
IPL २०२० च्या हंगामासाठी धोनी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामधे त्याचा नवीन लुक हा चाहत्यासमोर आला आहे. ज्याला चाहत्यांनी पंसती दिली आहे. २०१९ च्या वर्ल्डकप पासून धोनी हा अंतरराष्ट्रीय क्रिकेपासून दूर होता तर कोरोना काळात त्याने अपला संपुर्ण वेळ हा रांचीच्या फार्महाऊसवर घालवला ज्यामध्ये त्याचे वजन वाढल्याचे दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी