गोल पोस्ट महाराष्ट्र लग्नाआधीच भावी नवरीचा माथेफिरू भावी नवरदेवाने गळा चिरून केला खून

लग्नाआधीच भावी नवरीचा माथेफिरू भावी नवरदेवाने गळा चिरून केला खून

जालना, २० फेब्रुवारी २०२३ : मंठा तालुक्यातील बेलोरा गावात आज दुपारी भावी नवरीचा खून करून भावी नवरदेव घटनास्थळावरून फरारी झाला.

याविषयी अधिक माहिती अशी, की मंठा तालुक्यातील बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ कल्पना संदीप जाधव (वय १८) हिचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत १७ मार्च २०२३ रोजी विवाह ठरला होता. आज वधू आणि वर पक्षांकडील मंडळी जालना येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते. यावेळी नियोजित वर असलेला तरुणही बस्ता बांधण्यासाठी सोबत आलेला होता; मात्र अचानक तो गायब झाला. या गायब झालेल्या तरुणाने थेट वधूचे गाव बेलोरा गाठले. घरी फक्त नियोजित वधू दीप्ती ऊर्फ कल्पना ही एकटीच होती. यावेळी तिचा गळा कापला. त्यातच ती गतप्राण झाली. गावातील लोक जमा होताच खून करून आरोपी पसार झाला होता. दरम्यान, घटनास्थळी सेवली पोलिस दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. खून कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. सदर घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विनोद धनले

error: Content is protected !!
Exit mobile version