कल्याण डोंबिवलीत बाप्पाच्या आगमनाला सुरूवात..

डोंबिवली, २२ ऑगस्ट २०२०: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस हा वाढतच जात आहे. अनेक पॅटर्न वापरले तरी रूग्ण सख्येंत वाढ ही सूरूच आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सरकारच्या नियमांचे पालन करत अनेक गणपती मंडळांनी आणि घरगूती गणपती बसवणाऱ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले आहे. कोणतीही मिरवणूक न काढता सोशल डिस्टंसिंंगचे पालन करत मंडळांचे आणि घरगूती गणपतींचे आगमन झाले.

सरकारच्या नियमांनुसार घरगुती गणपतीच्या आगमनासाठी तीन पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसल्याने अनेक ठिकाणी गणपती हे त्यांच्या खाजगी गाड्यामधून आण्यात आले. त्याच प्रमाणे गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषणा करत सर्वाजनिक मंडळांनी बाप्पाचे स्वागत केले. गर्दी होऊ नये या साठी गणपती विक्रेत्यांनी आठ दिवस आधीच गणपती घेऊन जाण्यास सांगितल्याने गणेशोत्वाच्या आधल्या आणि पहिल्या दिवशी रस्त्यावर गर्दी दिसून आली नाही.

त्याचबरेबर अनेक गणपती विक्रेत्यांनी होम डिलेव्हरीचा पर्याय सुद्धा दिला आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची घरपोच सूविधाही मिळाली. यंदा मात्र दरवर्षी प्रमाणे गणपतीत नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला नाही. मिरवणूका, धूमधडाक्यात आगमन आणि ढोल ताशा आणि तरूणांचा जल्लोश या सर्व गोष्टीची यंदा कमतरता होती. मात्र, अशा परिस्थीतीत देखील भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मनोभावे केले आहे. त्यामुळे आगमनाच्या वेळेस गर्दीच्या परिसरात पोलिस देखील तैनात होते. त्यामुळे सांस्कृतीक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीत बाप्पाचे आगमन सूखकारकपणे पार पडले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा