आंबेगाव: (साईदिप ढोबळे) मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणी (ता.आंबेगाव)हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे, अरबाज राशिद खान (वय २१ धंदा मजुरी रा. बाबुरावनगर,ता. शिरूर जि. (पुणे), ओंकार नवनाथ भोसले (वय २१ रा. पी. डब्लू डी कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे)अशी या तरुणांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे १० जानेवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास सहाय्यक फौजदार आर. पी. कांबळे व पोलीस नाईक नवनाथ नाईकडे गस्त घालत असताना लोणी येथील तलाठी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत दोन तरुण संशयित रित्या फिरत असताना आढळून आल्याने त्यांना नाईकडे यांनी आवाज देऊन थांबवले असतात दोन्ही तरुण पळू लागल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा पिस्टल किंमत ३० हजार रुपये व तीन जिवंत काडतुसे किंमत ६ हजार रुपये असे एकूण ३६ हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत मंचर पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस करत आहे.