रत्नागिरी ११ डिसेंबर २०२३ : रत्नागिरीतील मौजे जामसूद येथे आमचा संकल्प विकसित भारत, जनजागृती यात्रेदरम्यान कृषी विभागाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय गट स्थापना तसेच माती नमुना काढण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्याचबरोबर नॅनो युरिया वापरण्याचे फायदे सांगून ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पाच प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषीदर्शनीचेही वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
मौजे सालपे तालुका लांजा येथे विकसित भारत संकल्पना यात्रा निमित्त माती नमुना काढणे याचे प्रात्यक्षिक, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खताचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन, सेंद्रिय पद्धतीने शेती करताना जीवामृत कसे तयार करायचे, त्याचा वापर आणि फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन, नॅनो युरिया चा वापर, पी एम किसान योजनेंतर्गत नवीन लाभार्थी यादी वाचन करून पात्र व अपात्र असल्याबाबत निश्चित करण्यात आले. म ग्रा रो ह यो अंतर्गत फळबाग लागवड, पी एम एफ एम इ, कृषी यांत्रिकीकरण, मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संदर्भात कृषी सहाय्यक प्रविण रत्नपारखी यांनी मार्गदर्शन केले तसेच विमा प्रतिनिधी संजय शेलार यांनी काजू , आंबा पिकासाठी हवामान आधारित फळ पीक विमा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सरपंच पूजा कांबळे, ग्रा. पं.सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक वृंद, शेतकरी तथा ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत काताळे येथे तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी दैनंदिनी वाटप करण्यात आली. मौजे – वनौशी तर्फे नातु येथे उपस्थित शेतक-यांना कृषीविषयक केंद्र व राज्य पुरस्कृत मुख्य योजना, फळपिक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान, मग्रारोहयो, फळबाग लागवड योजना, सेंद्रिय शेती आदी योजनेबाबत माहिती कृषी सहाय्यक एस सी कोळंबे यांनी दिली. तसेच जीवामृत कसे तयार करावे व जीवामृत चा वापर कसा करावा, त्याचे होणारे फायदे याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
आरोग्य विभागातर्फे ग्राम पंचायत वनवशी तर्फे नातू येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप चिंचघरकर, ग्रा.प.सदस्य, इतर शासकीय विभागातील कर्मचारी वर्ग व कृषी सहाय्यक स्नेहा कोळंबे, पालगड आदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर