आयसीसी टी-२० रँकिंग मध्ये बेंटन आणि हाफीजची चमकदार कामगिरी 

दुबई,  ३ सप्टेंबर २०२०: नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी -२० शृंखलेनंतर नवीन एम. आर. एफ. टायर्स आयसीसी पुरुष टी-२० रँकिंग जाहीर करण्यात आली. यामध्ये पाकिस्तान संघाचा खेळाडू मोहम्मद हाफीज आणि इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज टॉम बेंटन याला चांगलाच फायदा  झाला आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मध्ये झालेली ३ सामन्यांची टी-२० शृंखला ही १-१ च्या बराबरिने समाप्त झाली आहे.

टॉम बेंटन याने या शृंखलेत १३७ धावा केल्या आहेत आणि याच्याच जोरावर तो १५२ व्या स्थानावरून ४३ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच हाफीजने या शृंखलेत १५५ धावांच्या जोरावर ६८ स्थानावरून ४४ व्या स्थानावर मजल मारली आहे. तसेच मोहम्मद हाफीज शेवटच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला आणि मॅन ऑफ द सिरीज चा ही मान त्यानेच पटकावला.
इंग्लंड संघाचा खेळाडू डेव्हिड मलान ८४ धावा बनवून टॉप ५ फलंदाजांच्या लिस्ट मध्ये आला आहे. आणि जॉनी बेयरस्टो सुद्धा एक स्थान वर येऊन २२ व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ रेंकिंग आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा