बेर साहिब गुरुद्वारा येथे पंतप्रधान मोदी यांचे नमन

पाकिस्तान: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पाकिस्तानी समकक्ष इम्रान खान यांनी आपापल्या देशातील सीमापार मार्गाचे स्वतंत्रपणे उद्घाटन केल्यानंतर जगभरातील हजारो शीख यात्रेकरू शनिवारच्या करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या ऐतिहासिक उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीपुर्वी खुले केले जाणाऱ्या करतारपूर कॉरिडोरमार्फत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारा दरबार साहिबला जाणाऱ्या ५०० हून अधिक भारतीय यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला पंतप्रधान मोदी झेंडा दाखवतील. १२ नोव्हेंबरला इम्रान खान पाकिस्तानातल्या कॉरिडॉरचे उद्घाटन करतील आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह भारतीय शीख यात्रेकरूंचा स्वागत करतील. कॉरिडॉर भारताच्या पंजाबमधील डेरा बाबा नानक मंदिरास दरबार साहिबशी जोडते ज्याला करतारपूर साहिब असेही म्हणतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा