कॅलिफोर्निया, १६ ऑक्टोबर, २०२२: जर तुमचे मित्र- मैत्रिणी स्मोकिंग अर्थात धुम्रपान करत असतील, तर सावधान… त्याच्या सिगारेटच्या धुरामुळे तुम्हाला केवळ दम्याचे विकार होऊ शकतात, असं दिसून येत होतं. पण आता त्याबरोबर त्वचेचे अर्थात सोरायसिस, खाज, पुरळ येणे यांसारखे विकार होऊ शकतात, असं कॅलिफोर्नियाच्या विद्यापिठात झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे.
सिगारेटमध्ये भरलेल्या तंबाखूमुळे स्मोकिंग करताना त्यात असलेली तंबाखू जळते. त्यामुळे तंबाखूचा जो धूर होतो, त्यात असलेले कण हे शरीरावर अर्थात त्वचेच्या स्तरावर चिकटतात. त्यामुळे त्वचेचे विकार सुरु होतात. त्यातही खास करुन सोरायसिस सारखा गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.
तसेच धुरामुळे त्यात असलेले कण हे श्वसनप्रक्रियेला अडथळा निर्माण करतात. तसेच ते कण श्वासनलिकेत अडकलेले असतात. त्यामुळे दमा, अस्थमा किंवा फुप्फुसाचे विकार होण्यास सुरुवात होतो. याचीच पुढची स्टेज म्हणजे कॅन्सर अर्थात कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही तोंडाचा आणि फुप्फुसाचा कर्करोग हे स्मोकिंगमुळे होणारे कर्करोग मानले जातात.
कॅलिफोर्नियाच्या द लॅन्सेट जर्नल ऑफ फॅमिलीच्या ई-बायोमेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, ७० लाख लोकांना कॅन्सर हा तंबाखूच्या सेवनामुळे होतो. तर १२ लाख लोकांना हा कॅन्सर किंवा त्वचा विकार हे केवळ धुराच्या सानिध्यात आल्यामुळे होतात, हा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला.
त्यामुळे जर तुमचे मित्र-मैत्रिणी जर स्मोकिंग करत असतील तर त्यांना सावधान करा … किंवा तुम्ही सावधान व्हा…
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस