गोल पोस्ट महाराष्ट्र भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला; रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला; रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२३ : भारताच्या राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली आहे‌.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लडाखचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथुर यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्याही नियुकत्या करण्यात आल्या आहेत, असे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version