Bhagwan Mahavir Jayanti Ahimsa Week Pimpri-Chinchwad: भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने ४ ते १० एप्रिल दरम्यान अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सप्ताह रंगणार आहे.
शुक्रवारी कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात भक्तामर स्तोत्र पठणाने सप्ताहाला सुरुवात झाली. दुपारी निगडी आकुर्डी प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या वतीने ‘आनंद की रोटी’ या अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी निगडी येथील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात पाककला स्पर्धा रंगणार आहे. सायंकाळी मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठांशी संवाद साधला जाणार आहे. जैन श्वेतांबर तेरापंथ सभेच्या वतीने भगवान महावीर स्वामींवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडगाव, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथे हे शिबिर होणार आहे. सोमवारी कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने व्याख्यान, प्रश्नमंजुषा आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पिंपरी येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी चिंचवड येथील ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवडगाव येथील मैदानावर विश्व नवकार महामंत्र दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी अहिंसा रॅली, रक्तदान आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, अध्यक्ष श्रेयस पगारिया, कार्याध्यक्ष विजय भिलवडे, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर, श्रेणिक मंडलेचा, तुषार मुथा, संदेश गदिया, किरणभाई शहा, अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलासकुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन, वीरेश छाजेड, धीरज नहार आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































