भगवान सानप बीआरएस मध्ये दाखल, गंगाखेड विधानसभेचं राजकीय समीकरण बदलणार

गंगाखेड, १४ जुलै २०२३ : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तीन वेळेस संचालक व परभणी जिल्हा परिषदेचे तीन वेळेस सदस्य म्हणून राहिलेले, तालुक्यातील कोद्री जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलेले, विशेषतः तालुक्याच्या डोंगरी भागाचे युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले भगवान सानप यांनी आज सकाळी भारत राष्ट्र समिती मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार असून, मतदारसंघाला पुन्हा एक नवीन युवा उमेदवार या निमित्ताने मिळणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आगामी राजकारणाची दिशा विस्तारित करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. संघटनात्मक पक्ष वाढीवर राव स्वतः जातीने लक्ष देत आहेत.

मराठवाड्यातील लक्षवेधी विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेड विधानसभेचा समावेश होतो. येथील विधानसभेचे राजकारण केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजत आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुक अगदी दीड वर्षांवर आलेली असताना, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एका नवीन युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा