भागवत, शहा, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन

पुणे, २५ जुलै २०२३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी सकाळी मोतीबाग या संघ कार्यालयात सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप आणि संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवी यांचे पार्थिव बंगळूर येथून सोमवारी मध्यरात्री पुण्यात आणण्यात आले. आज सकाळी सात वाजल्यापासून भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची अंत्यदर्शन घेण्यास गर्दी झाली आहे.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आठ वाजता अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. १०. ४५ वाजता अमित शाह यांचे आगमन झाले. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर देवी यांचे पार्थिव वैकुंठधामकडे नेण्याची तयारी सुरू झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा