गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘रीलस्टार’ भैया गायकवाडला टोलनाक्यावर मारहाण; व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर नव्या वादाची ठिणगी

‘रीलस्टार’ भैया गायकवाडला टोलनाक्यावर मारहाण; व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर नव्या वादाची ठिणगी

सोशल मीडियावर भैया गायकवाड नामक तरुण ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे.लोकांच्या मदतीसाठी तो नेहमी तयार असतो, त्यामुळे त्याच्या व्हिडिओंना चांगली लोकप्रियता मिळते. “हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष” हा त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे. पण आता याच भैया गायकवाडला एका प्रकारामुळे टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

मारहाण कशामुळे झाली?
छत्रपती संभाजीनगरमधील सावंगी टोलनाक्यावर ही घटना घडली. भैया गायकवाड आणि त्याचे काही मित्र कारने प्रवास करत होते. त्यांच्या कारला फास्ट टॅग नव्हता, त्यामुळे टोलचे पैसे द्यावे लागणार होते. मात्र भैय्याने पैसे देण्यास नकार दिला आणि टोल कर्मचाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलू लागला. वाद वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली.

हा प्रकार मोबाईलवर चित्रीत करण्यात आला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये भैया गायकवाड “माझा व्हिडिओ डिलीट करा” अशी विनंती करताना दिसत आहे.

यानंतर भैय्याने आणखी एक रील बनवत टोल कर्मचाऱ्यांना धमकी दिली. त्यात तो म्हणतो, “अरे जळू नका, बरोबरी करा! परवा मी सिल्लोडला गेलो होतो, तिकडून परत येताना तुम्ही मला टोलनाक्यावर मारलं. पण काही झालं नाही, ही फक्त जाहिरात होती, पिक्चर अजून बाकी आहे!

या वक्तव्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेत दोन्ही बाजूंनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version