पुरंदर १ जानेवारी २०२१:गुरोळी येथील शॉर्टसर्किटने घर जळालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने तातडीची मदत करण्यात आली आहे. या कुटुंबातील संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाल्याने नेहमीच्या वापराचे संसारोपयोगी साहित्य त्यांना देण्यात आले..तर जळीत कुटुंबीयांना लोकांनी मदत करण्याचे आवाहन पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यात गुरोळी येथे २६ जानेवारी रोजी शॉट सर्किट मुळे रवींद्र पांडुरंग खेडेकर यांचे संपूर्ण घर जाळले होते.यामध्ये त्याच्या आंगवरील कपड्या शिवाय त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नव्हते .आणि म्हणून पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे यांना त्या कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली होती. यानंतर आज खाटपे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडेपाटील, नीरा शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, राजेंद्र शिंदे, भरत निगडे,राहुल शिंदे,रामचंद्र खेडेकर, संपत खेडेकर, माजी सरपंच रामदास जगताप, सुनील भंडलकर, इत्यादी उपस्थित होते..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी तहसील कार्यालयातून आजूनही कोणतीच मदत न केल्याने नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मदत करणार असल्याचं म्हटले आहे.पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुद्धा या बाधीत कुठूंबाला लोकांनी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे..
न्यूज अनकट प्रतिनिधी:- राहुल शिंदे