स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रशासन भवनाच्या दारात भजन-कीर्तन…

बारामती, ४ डिसेंबर २०२०: स्वाभिमानी शेतकरी संघाटनेच्या वतीनं दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पाणी व अश्रूधुराच्या फवारणी केल्याच्या निषेधार्थ गुरुवार दि.३ डिसेंबर रात्री ७ वाजल्यापासून प्रशासन भवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राजु शेट्टी यांच्या आदेशावरून रात्रभर भजन कीर्तन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर लादलेल्या नियमांचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजु शेट्टी यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आंदोलन करण्यात आलं असुन आंदोलनात स्वाभिमानचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर याचे राज्यात तीव्रपणे आंदोलन केलं जाईल आणि याला पूर्ण पणे केंद्र शासन जबाबदार राहील असं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी सांगितलं. तर यावेळी युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, बारामती तालुका अध्यक्ष विकास बाबर, कल्याण भगत उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा