भाजप खासदाराच्या मुलांनी युवकाला केली मारहाण

औरंगाबाद, दि. २४ मे २०२०: संपूर्ण देश कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे. त्याचवेळी शनिवारी रात्री औरंगाबाद, महाराष्ट्रात आणखी एक झुंज पाहायला मिळाली. भाजपा नेते आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्या दोन मुलांनी भाजपचा तरूण नेता कुणाल मराठे याच्या घरात घुसून हल्ला केला. भांडणाच्या वेळी कुणालचे आई-वडीलही कोटा कॉलनीमध्ये असलेल्या निवासस्थानावर उपस्थित होते. तरुण भाजप नेत्याच्या पालकांनाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कुणाला मराठे यांनी आरोप करताना असे म्हटले की, खासदारांची ही मुलं त्याच वॉर्ड मध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा ठेवत आहेत जेथे मी गेल्या बर्‍याच काळापासून समाजसेवा करत आहे. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी या क्षेत्रात खूप मेहनत घेतल्याचे कुणाल यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यांत येथे महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यांना माझ्या वाढत्या प्रसिद्धीची भीती वाटते त्यामुळे या कारणास्तव त्यांनी चिडून मला मारहाण केली.

भागवत कराड यांनी अद्याप राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली नाही. खासदारांनी स्थानिक पोलिसांना त्यांचे दोन्ही पुत्र हर्षवर्धन आणि वरुण यांच्याविरूद्ध गुन्हा न लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप कुणाल यांनी केला आहे. कुणाल यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे म्हणून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा