माळशिरस तालुक्यातील ‘भांबूर्डी’ गावाला महा-आवास अभियानांतर्गत उत्कृष्ट गृह संकुल यशस्वीपणे उभारणीचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान

46

सोलापूर २५ नोव्हेंबर २०२३ : माळशिरस तालुक्यातील भांबूर्डी गावाला राज्य शासना तर्फे जाहीर झालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज मुंबई येथे ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, गट विकास अधिकारी श्री विनायक गुळवे, सरपंच सौ लक्ष्मी वाघमोडे, तत्कालीन सरपंच सौ स्वाती वाघमोडे, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेविका सौ सारिका रविंद्र भापकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महा-आवास अभियान २०२१-२२ अंतर्गत राज्यस्तरीय अंमलबजावणी संनियंत्रण व मूल्यमापन करून उत्कृष्ट गृह संकुल यशस्वीपणे उभारणी करणाऱ्या भांबूर्डी ग्रामपंचायतीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याला दिशादर्शक अशी घरकुलाची उभारणी करण्यात आली आहे. या कामी जिल्हा परिषद सोलापूर पंचायत समिती माळशिरस ग्रामपंचायत भांबूर्डी यांचे सर्व वरिष्ठ अधीकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

याबाबत ग्रामसेविका सौ.सारिका रविंद्र भापकर यांनी विशेष कामगिरी केली. ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव करण्यात आला आहे. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार पटकविल्या बद्दल आमदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार श्री राम सातपुते यांनी ग्रामपंचातीचे अभिनंदन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा