भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली; किती येणार खर्च?

नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२२ भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणार्‍या लशीला गेल्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून लवकरच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणार्‍या लसीची किंमत एक हजार रुपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत ८०० रुपये आणि २०० रुपये जीएसटी, रुग्णालयाचे चार्ज असणर आहे.

https://twitter.com/NewsRaghav/status/1607635029399830528?s=19

दरम्यान, गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या वॅक्सिनची किंमत ८०० रुपये आणि जीएसटी पाच टक्के असणार आहे.

जानेवारी अखेरपर्यंत उपलब्ध होणार लस

इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोवॅक्सीन आणि कोव्हिशिल्डचे लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागिरकांना उपलब्ध होणार आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसला १५० रुपये एडमिनिस्ट्रेटिव दर आकारण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम जोडून कोरोना लसीची किंमत हजार रुपये होण्याची शक्यता आहे. तर सरकारी रुग्णालयात लसीची किंमत ३२५ रुपये असणार आहे.

नेझल कोरोनो वॅक्सिन सेंट लुईस येथील वॉश्गिंटन विद्यापीठात विकसीत करण्यात आली आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-१९ लसीचा पर्याय कोविन ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा