तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर ‘भारत जोडो’ यात्रा पुन्हा सुरु; राहुल गांधी यांचा सहभाग

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर २०२२: तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली. तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील मक्ताल येथून ५० व्या दिवसाचा प्रवास सुरू झाला. गुरुवारी या पदयात्रेत काँग्रेसचे नेते पुन्हा राहुल गांधी यांच्यासोबत सामील झाले.

दिवाळी निमित्त ‘भारत जोडो’ यात्रेला तीन दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. तसेच नेतृत्व करणारे राहुल गांधी यावेळी दिल्लीत पोहोचले होते. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष झाल्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर आज पुन्हा प्रारंभ झाला असून आजच्या दिवशी २७ किमी दूर जाण्याचा संकल्प असून मकथल येथील श्री बालाजी फॅक्टरी मध्ये रात्री विश्रांती घेतली जाणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत इकाईचे अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार उत्तम कुमार रेड्डी, काँग्रेस विधायक दल (सीएलपी) चे नेता भट्टी विक्रमार्क आदी उपस्थित होते.

मकथल ते तेलंगणा दरम्यान विविध भागांमध्ये सोळा दिवस ही यात्रा सुरु असणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा