भारत-पाकिस्तान यांच्यात कैद्यांच्या याद्यांचे आदानप्रदान

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने आपआपल्या देशातील अणुकेंद्रांची माहिती एकमेकांना दिली आहे. १ जानेवारीला या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.
द्विपक्षीय करारातील तरतुदीनुसार या देशांना एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ले करण्यास प्रतिबंध आहे. भारत व पाकिस्तान यांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी या यादीची देवाणघेवाण केली.
मागील २९ वर्षांपासून अशा पद्धतीने ही माहिती दोन्ही देशांमध्ये हस्तांतरीत करण्यात येते. काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशात तणावाचे संबंध असतानाही या वर्षी ही परंपरा सुरू राहिली.
भारत व पाकिस्तान यांच्या राजनैतिक सूत्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.३१ डिसेंबर १९८८ रोजी याबाबत करार झाला होता. त्याची अंमलबजावणी २७ जानेवारी १९९१ रोजी सुरू करण्यात आली. या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना त्यांच्या आण्विक आस्थापनांची माहिती देणे बंधनकारक आहे.

१ जानेवारी १९९२ रोजी पहिल्यांदा आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्यात आली होती. त्यामुळे यंदाही २९ व्या वर्षी याद्यांची देवाणघेवाण करण्यात आली.
पाकिस्तानने त्यांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी भारताला प्रदान केली आहे. त्यात २८२ भारतीय कैदी आहेत. त्यात ५५ नागरिक तर २२७ मच्छीमार आहेत. भारत सरकारनेही अशी यादी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला सादर केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा