नवी दिल्ली, १३ ऑगस्ट २०२२: केन्द्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून वीएलसी ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. हे ॲप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता असं मीडिया रिपोट मध्ये बोललं जात आहे.
आता सरकारने या ॲपवर बंदी आणली आहे. तसेच गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल प्ले स्टोअर साईटवरुन हटवण्यात आले आहे. वीएलसी मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्याआधी बंद करण्यात आली आहे. पण कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आयटी नियम २००० नूसार, एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, चोरुन युजरच्या संमतीशिवाय वापरणे, ती इतरांना देणे, विकणे किव्हा बिघाड करणे, हॅक करणे, ओळखीच्या पुराव्यांचा गैरवापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
भारत सरकार कडून याआधीच चीनचे ५९ ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिकटॉकसह युसी ब्राऊजर, शेअर इट ॲपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. आता यापुढे वीएलसी ॲप हा भारतात बंद करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर