गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पोस्ट खात्याचा मोठा बदल! आता पोस्टमन ‘घरपोच’ सेवा देणार ऑनलाइन बुकिंग करा,...

पोस्ट खात्याचा मोठा बदल! आता पोस्टमन ‘घरपोच’ सेवा देणार ऑनलाइन बुकिंग करा, वेळ आणि खर्च वाचवा!

भारतीय टपाल खात्याने ग्राहकांना दिलासा देणारी ‘क्लिक करा आणि बुक करा’ ही नवी योजना सुरू केली आहे. या ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी २.०’ अंतर्गत, आता पोस्टमन थेट तुमच्या घरी येऊन पत्र किंवा पार्सल घेऊन जाणार आहे! या सुविधेसाठी तुम्हाला पोस्ट खात्याच्या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन पत्र/पार्सलची नोंदणी आणि ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.

नोंदणीनंतर पोस्टमन वस्तू घेऊन जाईल. यामुळे पोस्ट कार्यालयाच्या रांगेत थांबण्याचा आणि प्रवासाचा खर्च वाचेल. निवडक शहरांमध्ये सुरू झालेली ही डिजिटल प्रणाली टपाल सेवेला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि वेगवान बनवणार असून, यामुळे स्पीड पोस्ट आणि रजिस्ट्री सेवांमध्ये वेळेची मोठी बचत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version