भरधाव कारच्या अपघातात तिघे जखमी

4

जालना, दि.२४ मे २०२० : शहागडहून वडीगोद्री कडे जाणाऱ्या भरधाव कारचालकाचा ताबा सुटल्याने गहिनीनाथ नगर पाटीवर कार आदळून पलटी झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी( दि.२३)रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.

औरंगाबाद – सोलापुर महामार्गावरील गहिनीनाथनगर जवळ शहागड हुन वडीगोद्री कडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ०१ बी डी ८०४६ च्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी गहिनीनाथ नगर पाटीवर आदळून कार ने दोन पलट्या मारल्या. यात कार मधील नितीन मच्छिंद्र  घुगे  (वय ३५). कृष्णा शिवाजी भागवत (वय ३०) रा.नालेवाडी ता.अंबड बंडू आनंदराव खाडे (वय ४०) रा.डोणगाव ता.अंबड तिघेही जखमी झाले आहे.

या घटनेची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना कळताच गहिनीनाथ नगर येथील नागरिकांनी त्यांना गाडीच्या बाहेर काढून  अपघात ग्रस्त तरुणाच्या गावात कळवले. जखमींना खाजगी वाहनाने पाचोड येथे हलविण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा