भारतात मिळतात स्वस्त औषधे

नवी दिल्ली: जगात औषधांसाठी जेवढे पैसे खर्च केले जातात. त्यापेक्षा ७३ टक्क्यांनी कमी खर्च भारतातील लोकांना औषधांवर करावा लागतो, असे नुकत्याच एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या दृष्टीने भारतात औषधे स्वस्त असल्याचे उघड होते. सर्वाधिक महागडी औषधे मिळणारे ५ देश असून यातही अमेरिका आघाडीवर आहे.

लंडन आणि बर्लिन येथील ‘मेडबेल’ या औषधनिर्मिती कंपनीने हे सर्वेक्षण केले. त्यासाठी त्यांनी जगातील ५० प्रमुख देशांमधील औषधांच्या किमती तपासून पाहिल्या. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार जगातील औषधांपेक्षा ७३.८२ टक्क्यांनी स्वस्त औषधे भारतात मिळतात. सर्वाधिक स्वस्त औषधे थायलंड या देशात मिळतात. तेथे औषधे जगातील औषधांच्या तुलनेत ९३.९३ टक्क्यांनी स्वस्त मिळतात असे स्पष्ट झाले आहे.
स्वस्त औषधे मिळणार्‍या देशांमध्ये थायलंडपाठोपाठ केनिया दुसर्‍या (९३.७६ टक्के), मलेशिया तिसर्‍या (९०.८० टक्के) तर इंडोनेशिया चौथ्या (९०.२३ टक्के) क्रमांकावर आहे. याशिवाय ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांपेक्षाही हिंदुस्थानात औषधे स्वस्त आहेत.

सरकारी औषधेही स्वस्त…
‘मेडबेल’ कंपनीने केलेल्या सर्वेक्षणासाठी सर्वसामान्य लोकांना जी औषधे नेहमी लागू शकतात. त्याच औषधांचा विचार केला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधून देण्यात येणार्‍या औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. हृदयरोग, अस्थमा, रक्तदाब यासारखी औषधे सर्वसामान्यांना हमखास लागतात. त्या औषधांना जगात जास्त किंमत मोजावी लागते. मात्र भारतात हीच औषधे स्वस्त आहेत असे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा