भारतातील वॉरेन बफेट

राकेश झुनझुनवाला यांना भारतातील वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाते. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म मुंबई मध्ये ५ जुलै १९६० मध्ये झाला. ते मुंबई मध्येच लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर होते.
राकेश यांना लहानपणापासूनच स्टॉक मार्केट मध्ये रुची होती. राकेश यांचे वडील आणि त्याच्या वडिलांचे मित्र जेव्हा स्टॉक मार्केट वर गप्पा मारत असायचे तेच ते १२ ते १३ वर्षाचे असताना त्याच्या वडिलांना स्टॉक मार्केट मधील वेगवेगळे प्रश्न विचारत असत. जसे की शेअर ची किंमत कमी जास्त का होते, किंमत कशी ठरते आणि त्यांचे वडील या सर्वांची उत्तर त्यांना सविस्तर देत अस्त.
राकेश झुनझुनवाला यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन मुंबई मधील sydenham विद्यालयातून केले. १९८५ मध्ये त्यांनी त्यांच्या सी ए चे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या वडिलांना सांगितले की मला स्टॉक मार्केट मध्ये मझ करियर करायचं आहे. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, तू तेच कर ज्या मध्ये तुला आनंद भेटतो पण तू माझ्याकडे कीव माझ्या मित्रांकडे पैसे मागण्यासाठी यायचं नाही.
त्यावेळेस राकेश यांच्याकडे फक्त ५००० रुपये होते. राकेशचा भाऊ तेव्हा सी ए ची तयारी करत होता त्यांच्याकडे एक क्लाएंट होती जीच्याकडे बऱ्यापैकी भांडवल होते. त्या महिलेला तिच्या भांडवलावर चांगला परतावा हवा होता. त्या वेळेस बँकांमधील ठेवीवर १०% चे व्याज मिळत होते. राकेश यांनी त्या महिलेला सांगितले की मी तुम्हाला १८% परतावा मिळवून देऊ शकतो. त्या महिलेने या आश्वासनाकडे पाहत राकेश यांना २.५ लाख रुपये दिले. याचबरोबर त्यांनी आणखी एका व्यक्तीकडून ५ लाख घेतले होते . असे करुन त्यांनी त्यांचे सुरवातीचे भांडवल तयार केले.
स्टॉक मार्केटच्या करिअर मध्ये त्यांनी सुरवातीला ५ ते १० लाखापर्यंत नाव मिळवला परंतु नंतरुंच्या काही वर्षांत त्यांना अडचणींना समोर जावे लागले. पुढच्या २-३ वर्षाच्या काळात त्यांना थोडे नुकसान ही झाले. त्या नंतर त्यांनी १९८८ मध्ये त्यांनी अडीच लाख शेअर २८ रुपये किमतीवर सेसागोआ या कंपनीचे घेतले आणि त्याच कंपनीचे २.५ लाख शेअर ३५ रुपये किमतीवर परत विकत घेतले. त्या नंतर सहा महिन्यांमध्ये त्या कंपनीच्या शेअर ची किंमत ६५ रुपयांवर गेली होती.
१९८९ मध्ये व्ही पी सिंग यांच्या सरकारमध्ये मधू धनवटे हे अर्थ मंत्री होते आणि १९८९ मधील मधू धनवटे यांचे बजेट राकेश यांच्या कारकिर्दीत एक वेगळे वळण देणारे ठरले. त्या वेळेस मार्केट मधील सर्वांना धनवटे यांच्या बजेट सामाजिक गोष्टींना अधरून असेल असे वाटत होता. मार्केट मधील मोठे मोठे गुंतवणूकदार या बजेट मुळे घाबरून होते व सर्व विक्रीवर भर देत होते. परंतु राकेश यांच्या मनात वेगळे चालले होते. व्ही पी सिंग हे ठाकूर होते त्यामुळे त्यांना उद्योगातील ज्ञान असावे असे त्यांना वाटत होते. यामुळे राकेश यांना वाटत होते की ते असे बजेट नाही बनवणार ज्यामुळ उद्योग धंद्यांना नुकसान पोहोचेल. बजेट आल्यावर राकेश यांचा अंदाज अचूक ठरला होता. धनवटे यांनी उद्योग धंद्यांना पूरक असे बाजार जाहीर केले होते. बजेट येण्या आधी राकेश यांचे नेटवर्थ २ कोटी होते बजेट नंतर त्यांचे नेतवर्थ पुढच्या ५-६ महिन्यात ४० ते ५० कोटी पर्यंत गेले.
त्यानंतर त्यांनी रेअर एंटरप्राइज ची स्थापना केली जी एक असेट मॅनेजमेंट फर्म होती. या फर्म मार्फत ते त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात. rare मधील पाहिले दोन शब्द राकेश यांच्या नावाने घेतले गेले होते आणि दोन शब्द त्यांच्या पत्नी रेखा यांच्या नावाने घेतले होते. त्यांनी २००२-२००३ मध्ये टाइटन या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स विकत घेतले जी सध्या ज्वेलरी मधील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यावेळेस त्यांनी हे शेअर्स ४.५ रुपयांचा किमतीवर घेतले होते. त्यानंतर तो शेअर ८० रुपयापर्यंत गेला होता. क्रिकेट पुढे ऐंशी रुपयावरून टायटन चा शहर २० रुपयांवर आला होता. जेव्हा शहर एवढा पडला होता तेव्हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ ची व्हॅल्यू 300 कोटी पर्यंत घसरली होती. परंतु त्यांनी या किमतीवर त्यांचा एकही शेअर विकला नाही कारण त्यांना वाटत होते ही आशेर पुन्हा वर जाणार आहे. आणि आज या शेअरची किंमत १३०० रुपयांपर्यंत गेलेली आहे. झुंझुंवला यांचे हे उदाहरण शेअर मार्केटमधील पेशन्स किती महत्त्वाचे असतात ते दर्शवते. फक्त टायटन च नाहीतर यासारखे अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी आपले पैसे गुंतवले आणि आज त्या शेअर्सची किंमत कितीतरी पटींनी वाढलेली आहे.
झुनझुनवाला हे त्यांच्या चुकांवर दुःख व्यक्त न करता त्या चुकांमधून ते नवीन काहीतरी शिकतात. ते म्हणतात की तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला अनुभवाची गरज आहे आणि हा अनुभव सुखा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. त्यांच्या मते शेअर मार्केट हे सुप्रीम असते ते चुकीचे किंवा बरोबर नसते. चुकीचे आपण असतो आपण केलेल्या चुका आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्या चुकांमधून आपण नवीन काहीतरी शिकले पाहीजे.
राकेश झुनझुनवाला यांची सध्याची संपत्ती पंधरा ते सोळा हजार कोटी रुपये झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी २०२० मध्ये पाच जुलैला म्हणजे त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या संपत्ती मधील २५ टक्के रक्कम दान करण्याचे ठरविले आहे.

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा