भारतीय क्रिकेट टीमची भिंत म्हणून ओळख असलेला राहुल द्रविड

अनेकांसाठी आदर्श असलेला, अतिशय सभ्य क्रिकेटपटू राहुल द्रविडला ‘क्रिकेटचा खरा जेंटलमन’ही संबोधले गेले आहे. अतिशय शांत आणि गंभीर स्वभावासाठी फेमस असलेला द्रविड भारतीय फलंदाजीचा ‘भिंत’ म्हणून ओखळला जातो. त्याने काही काळ भारतीय टीममध्ये महत्वाची जबाबदारी बजावलेली आहे. त्याच्या क्रिकेटचे आजही तेवढेच चाहते आहेत. त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

राहुल द्रविड याचे टोपण नाव ‘जॅमी’ असे ठेवण्यात आले. त्याच्या या टोपण नावामागे एक वेगळीच गोष्ट आहे. राहुलचे वडिल किसान कंपनीमध्ये काम करत होते. त्याठिकाणी जॅम बनवला जात असे. त्यामुळे ते आपल्या मुलाला जॅमी म्हणू लागले.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये द्रविड एकच सामना खेळला. तो त्याचा पहिला आणि शेवटचा सामना होता. त्यामुळे पदार्पणातच निवृत्त होण्याचा आगळा-वेगळा विक्रम त्याच्या नावावर झाला. कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक देशाविरोधात शतक झळकावणारा द्रविड जगातील एकमेव क्रिकेटर आहे.
राहुल द्रविड पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटीमध्ये भारताला पहिला विजय मिळवून दिला होता. द्रविड कर्नाटक ज्यूनियर स्टेट संघाकडून हॉकि खेळला आहे. राहुल द्रविड असा एकमेव भारतीय आहे जो ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळण्यास लायक असल्याचे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रॉथने म्हटले होतेराहुलने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडूंचा (कसोटीतील २८६ डाव, ३१ हजार २५८ चेंडू) सामना केला आहे.
कसोटीत सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्डही २१० राहुलच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या पार्टनरशिपचा रेकॉर्डही द्रविडच्या नावावर आहे. जानेवारी २००६ मध्ये राहुलने सेहवागसह पाकिस्तानविरुद्ध ४१० धावांची भागीदारी साकारली होती. याशिवाय राहुलने व्ही. व्ही. एस. लक्ष्मणसह कोलकातामध्ये २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७६ धावांची भागीदारी केली होती. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १४ कसोटी सामने जिंकले होते. त्याच्या विजयाची टक्केवारी ६२.१६ होती. द्रविडने भारतीय संघासाठी १६४ कसोटी सामन्यांत १३,२८८धावा (३६ शतक, ६३ अर्धशतक) ३४४ एकदिवसीय सामन्यांत १०,८९९ धावा (१२ शतकं, ८३ अर्धशतक) केल्या.
कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षणाव्यतिरिक्त सर्वाधिक कॅच घेण्याचा जागतिक विक्रम द्रविडचा आहे. निवृत्तीसमयी त्याने १६४ टेस्ट सामन्यांमध्ये २१० कॅचेस यष्टीरक्षणाव्यतिरिक्त घेतल्या.तब्बल १६ वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मार्च २०१२ मध्ये द्रविडने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती घेतल्यावरही भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल उत्तम कामगिरी करत आहे.
राहुल द्रविडला अर्जुन अ‍ॅवार्ड आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. द्रविडने ICC Test Player of the year आणि Player of the year हा अ‍ॅवार्ड आपल्या नावे केला होता. तसेच २००४-०५ मध्ये राहुल द्रविडला सेक्सिएस्ट स्पोर्ट्स पर्सनॅलिटीच्या अ‍ॅवार्डने गौरवण्यात आले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा