भारतीय रेल्वेचा भोंगळ कारभार,

राऊरकेला, दि. २३ मे २०२०: भारतीय रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. २१ मे रोजी महाराष्ट्रातील वसई येथून गोरखपूरला निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन ओडिशामधील राऊरकेला येथे पोहोचली. पूर्व केंद्रीय मंत्री तसेच काँग्रेसचे नेते आर पी एन सिंग यांनी भारतीय रेल्वेच्या या कारभारावर निशाणा साधला आहे.

ही श्रमिक स्पेशल ट्रेन २१ मे रोजी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी मुंबई येथील वसई स्टेशन वरून निघाली होती. ही श्रमिक स्पेशल ट्रेन बिहार मधील गोरखपुर येथे जाणार होती. परंतु ती दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रकार समोर आला आहे. गोरखपूर ला न जाता ती ओडिशामध्ये राऊरकेला येथे पोहचली.

वसई पासून ते गोरखपूर हे अंतर १५०० किलोमीटरचे आहे तर वसई ते राऊरकेला आंतर १५०० किलोमीटरचे आहे. मजूर या झालेल्या घटनेमुळे संतप्त आहेत. वसई ते राऊरकेला पोहोचण्यासाठी तब्बल २४ तासांचा प्रवास करावा लागला आहे आणि आता इथून गोरखपुर साठी आणखीन आठ ते दहा तास लागणार आहेत. या स्थलांतरित मजुरांना येथून गोरखपूरला पोहोचण्यासाठी आणखीन ८०० किलोमीटर चा प्रवास करावा लागणार आहे.

अशा कडक उन्हाळ्यामध्ये रेल्वेनेही मजुरां सोबत अश्या प्रकारची मस्करी का केली आहे? सामान्य स्थितीप्रमाणे आता कोणत्याही इतर गाड्या चालू नाहीत तरीही रेल्वे प्रशासनाने सिग्नलचे कारण समोर आणले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा