गोल पोस्ट क्रीडा बास्केट बॉल भारतीय बास्केटबाॅलपटू सतनामसिंगचे निलंबन

भारतीय बास्केटबाॅलपटू सतनामसिंगचे निलंबन

नवी दिल्ली : भारताचा बाॅस्केटबाॅलपटू सतनामसिंग भामरा हा अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्याच्यावर राष्ट्रीय अमली पदार्थाविरोधी संस्थेने कारवाई करत त्याला काही काळासाठी निलंबित केले आहे.

पंजाबच्या २३ वर्षीय सतनामसिंगचा २०१५ मध्ये एनबीए स्पर्धेतील एका संघात समावेश झाला होता. दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी गेल्या महिन्यात बेंगळुरू येथे शिबिर आयोजित केल्यानंतर तेथील डोपिंग ( उत्तेजक द्रव्य चाचणी) टेस्टमध्ये तो दोषी आढळला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version