गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘तेरे नाम’ चित्रपटातील वेडसर मुलगी आता दिसते ‘अशी’

‘तेरे नाम’ चित्रपटातील वेडसर मुलगी आता दिसते ‘अशी’

मुंबई: सलमान खानच्या ‘तेरे नाम’ ह्या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. यातील सलमान खानची राधे हि भूमिका तर गाजलीच पण यासोबतचा चित्रपटातील एका वेड्या मुलीने निभावलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली होती.
वेड्यांच्या इस्पितळात जाणाऱ्या सलमानला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटणारी ती वेडसर महिला आणि तो सीन पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते.
चित्रपटात दाखवण्यात आलेली वेडी मुलगी एक मोठी नायिका असून तिचे नाव राधिका चौधरी असे आहे.

राधिकाविषयी..
१९९९ मध्ये एका तेलगू चित्रपटाद्वारे राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. राधिकाने मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर डिग्री मिळविली आहे. यानंतर बॉलिवूडमध्येही ती दिसली.
राधिकाने विभिन्न भाषांमध्ये ३० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. २०१० मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या ‘आॅरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ऐस अवार्ड जिंकला होता.

error: Content is protected !!
Exit mobile version