गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजला व्हाइटवॉश

नवी दिल्ली (वृत्त संस्था) : भारताच्या महिला क्रिकेट संघाने यजमान वेस्ट इंडिजचा ६१ धावांनी पराभव करत ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला.
भारताकडून वेदा कृष्णमूर्तीने ५७ तर जेमिमा रॉड्रीग्जने ५० धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना लवकर बाद झाल्या. मात्र यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोघींनी अर्धशतके फटकावली.

वेस्ट इंडिजचा डाव केवळ ७३धावांवर आटोपला. क्‍योश्‍ना नाईट आणि शेमिन कॅम्पबेल अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या उभारू शकला नाही. भारताकडून अनुजा पाटीलने २ तर, राधा यादव, पूनम यादव, पूजा वस्त्रकर आणि हरलीन देओल यांनी प्रत्येकी १-१ बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक -भारत २० षटकांत ३बाद १३४ (वेदा कृष्णमूर्ती ५७, जेमिमा रॉर्डीग्ज ५०). वेस्ट इंडिज – २० षटकांत ७बाद ७३ (क्‍योश्‍ना नाईट २२, शेमिन कॅम्पबेल १९, अनुजा पाटील २-३).

error: Content is protected !!
Exit mobile version