गोल पोस्ट स्पॉटलाइट मालिका विश्‍व अनु मलिक यांची इंडियन आयडॉल मधून हकालपट्टी

अनु मलिक यांची इंडियन आयडॉल मधून हकालपट्टी

मुंबई: प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनू मलिक यांची सोनी टीव्हीवरील संगीत शो ‘इंडियन आयडॉल’ मधून पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. मलिक यांच्यावर #Me Too मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्यामुळे इंडियन आयडॉल शोमधून त्यांना बाहेर काढल्याचे बोलले जात आहे.

#Me Too मोहिमेअंतर्गत मलिक यांच्यावर पार्श्वगायिका सोना मोहापात्रा यांनी लौंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे मलिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण या टीकेनंतरही मलिक यांना शो चे परिक्षक म्हणजे जज बनवण्यात आले होते. सोनी टीव्हीवर मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे मलिक स्वत:हून शोमधून बाहेर पडणं पसंत केल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, अनू मलिक इंडियन आयडॉल या शोमधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी आता नवीन परिक्षक येणार असल्याची बोललं जात आहे. मात्र अधिकृत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version