भारतीय रिझर्व्ह बँकेचे भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होण्याचा मान चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना मिळाला होता. हे मराठीतील अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी रोजी झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख ह्या चिंतामणराव देशमुख यांच्या पहिल्या पत्नी होत्या.याशिवाय त्यांनी भारत सरकारमध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले होते. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर म्हणून१९४१-४३ मध्ये कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब त्यांना बहाल केला होता. त्यानंतर इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर झाले होते.
१ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता.