मुंबई, दि.१४ जून २०२० : भारतातील सर्वात वयस्कर प्रथमश्रेणी क्रिकेटर अशी ओळख असलेले वसंत रायजी (वय १००) यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील वाळकेश्वर या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वसंत रायजी यांनी १९४० च्या दशकात प्रथम श्रेणी क्रिकेटचे नऊ सामने खेळले होते. त्यांनी खेळलेल्या नऊ प्रथम श्रेणी सामन्यात २७७ धावा केल्या. ६८ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताच्या क्रिकटच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लिखाणही केले होते.
जानेवारी २०२० मध्ये रायजी यांनी वयाची १०० वर्ष पूर्ण केली होती. तेंव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी त्यांच्या घरी जावून भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट मधील ब-याच गोष्टींना उजाळा दिला. भारतीय क्रिकेटचे अनेक पैलू व आपल्या कारकिर्दीत अनुभवलेल्या अनेक गोष्टी त्यावेळी त्यांनी कथन केल्या .
न्युज अनकट प्रतिनिधी: