रत्नागिरी, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ : काल राज्यात १८ जिल्ह्यांमधील ८२ तालुक्यांमधून १ हजार १६५ ग्रामपंचायतीचे मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल समोर आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गुहागर तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाचा सफया झाला आहे. येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार भास्कर जाधव यांची मतदार संघावरील पकड कायम आहे.
१८ जिल्ह्यांमधील ८२ तालुक्यांमधून १ हजार १६५ ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरु आहे. यातील पहिला कल समोर आला. यात गुहाघरमधील भाजपच्या ताब्यात असलेल्या दोन्ही ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. अंजनवेल आणि वेलदूर या दोन ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. दिव्या सुमित वनकार या वेलदुर तर सोनल रामनाथ मोरे या अंजनवेल सरपंच पदी निवडून आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील निकाल बिनविरोध पकडून पुढीलप्रमाणे, एकूण ग्रामपंचायत-५१, मतदान झालेल्या ग्रामपंचायती- ३६, बिनविरोध ग्रामपंचायती-१५, शिवसेना ठाकरे – ११, शिंदे गट – ०४, भाजप- ००, राष्ट्रवादी- ०१
काँग्रेस- ००, इतर- ०६
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर