भिडे, एकबोटे यांना जिल्हाबंदी

पुणे: भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.

‘या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विजयस्तंभ परिसरात प्रकाश व्यवस्थेसाठी चार हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत; तसेच पेरणे फाटा ते पेरणे गाव या रस्त्यावर कायमस्वरूपी पथदिवे बसविण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश व्यवस्था व ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात येणार आहे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. ‘ टँकरद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, फिरते स्वच्छतागृह, एसटी महामंडळ व पीएमपीएल बसची सोय, आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा तयार ठेवण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे,’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा