भिगवन जवळ ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात

इंदापूर (प्रतिनिधी) दि.१७: इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवन नजीकच्या बिल्ट कंपनी जवळ दिनांक १६ रोजी मध्यरात्री ट्रॅक्टर आणि ट्रक यांच्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर सोलापूर दिसे होऊन ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुणे दिशेला चालला होता दरम्यान पुणे दिशे हुन सोलापूर दिशेकडे जाणारा मालवाहतूक ट्रक बिल्ट कंपनी कडे जाण्यासाठी अचानक वळवील्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटून ट्रॅक्टर मालवाहतूक ट्रक च्या खाली घुसला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. यामध्ये ट्रॅक्टर चालक (नाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाला असून मालवाहतूक ट्रकचालकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मालवाहतूक ट्रक चालकाने अचानक ट्रक वळविल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले. सदर अपघाताची नोंद भिगवन पोलीस स्टेशन मध्ये हे करण्याचे काम सुरू असल्याचे समजले तसेच जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले याचे देखील समजले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा