भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनला आग

दौंड : तालुक्यातील पाटस येथे असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील साखरेच्या गोडाऊनला आज (दि.२५) रोजी सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत गोडाऊन मधील साखर आगीत जळून खाक झाली असून या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या साखर साठवणूक करणाऱ्या सहा नंबरच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागल्यामुळे गोडाऊन मधून धूर बाहेर येत असल्याचे सिक्युरिटी गार्डच्या लक्षात आले. यानंतर  कुरकुंभ एमआयडीसीचा अग्निशमन दलाच्या बंबाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र या आगीत लाखो रुपयांच्या साखरेचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही. या गोडाऊन मध्ये १५-१६ या वर्षी गाळप केलेली साखर ठेवण्यात आली होती. या गोडाऊनमध्ये ६९ हजार क्विंटन साखर होती. या चालू हंगामात कारखान्याचे गाळप बंद असल्याने  त्यामुळे येथे सिक्युरिटीगार्ड शिवाय कोणताही कामगार व अन्य कोणीही नव्हते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा