गोल पोस्ट महाराष्ट्र भीमाशंकर देवस्थान च्या विश्वस्ता वर जीवघेणा हल्ला

भीमाशंकर देवस्थान च्या विश्वस्ता वर जीवघेणा हल्ला

भिमाशंकर: भिमाशंकर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब कौदरेंवर रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात तरुणांनी जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब कौदरे व पत्नी उज्ज्वला कौदरे असे दोघेजण गंभीर जखमी असुन दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

लबाळासाहेब शंकर कौदरे (वय ३८) व पत्नी उज्ज्वला हे दोघे जण मंदीर परिसरातुन घराकडे जात असताना हनुमान तळ्याजवळ तीन अज्ञात व्यक्तींनी बाळासाहेब यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असुन उज्ज्वला यांना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन हल्ला का व कशासाठी झाला हे कारण अजुनही अस्पष्ट आहे, राजगुरुनगर पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत.

बाळासाहेब कौदरे हे भिमाशंकर देवस्थानचे विश्वस्त आहे. ते भिमाशंकर येथे गोशाळा चालवतात व कुटुंबासमवेत हॉटेल व्यवसाय करतात.

error: Content is protected !!
Exit mobile version